चांदण्यातील सहल


कॉलेजजीवनात 'सहल 'हा सगळ्याच्या आवडीचा आणि उत्साहाचा विषय असतो आतापर्यंत आमच्या
मित्रमंडळीच्या अनेक सहली काढून झाल्या होत्या . वर्षासहल काढून पावसात चिंब भिजण्याची हौसही आम्ही भागवून घेतली होती . या वेळेस काही नवे अनुभवावे असे  वाटत होते . अलीकडच्या काळात टयूबलाईटच्या  चकचकाटमुळे चांदणे  अनुभवताच येत नाही . त्यामुळे मग सगळ्यांच्या मते चांदण्यातील सहल काढण्याचे ठरले . आमच्या भूगोलाच्या अध्यापकांनीही आमच्या कल्पनेला दुजोरा दिला . गावाबाहेरच्या , जवळच्याच एका टेकडीवर जाण्याचे ठरले . जमल्यास तारांगणाचाही थोडा अभ्यास करायचा होता . बरोबर दुर्बिणीही घेतल्या होत्या .

आम्ही वीस -पंचवीस मुलं -मुली महाविदयालयाच्या प्रांगणातून निघालो . पौर्णिमेची  रात्र असल्यामुळे चांदण्याला जणू भरती आली होती . सारा  आसमंत चांदण्याने तुडुंब भरला होता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आभाळ निरभ्र होते आजूबाजूला विस्तीर्ण शेते पसरली होती . गावाबाहेर आल्यामुळे सर्वत्र शांतता होती . हवेत सुखद गारवा जाणवत होता . दूरवरून रातराणीचा व मधुमालतीचा संमिश्र गंध येत काही चांदण्यालाच गंध येतो आहे ,असा भास होत होता . आजूबाजूची झाडे आणि समोरचे डोंगर चांदण्यात न्हाऊन निघत होते या भारलेल्या वातावरणात खूप बोलायची इच्छा असूनही सगळ्यांनी मौन धारण केले होते . 'माझ्या गोव्याच्या भूमीत  येई चांदणे माहेरा ' ही बोरकरांच्या कवितेतील ओळ ; तर किती दिवसात नाही ,चांदण्यात गेलो 'ही काव्यपंक्ती आठवली .
'चला आता ,टेकडीवर जाऊन तारे पाहू या ,'सरांच्या या शब्दांसरशी आम्ही सर्वजण डोंगर  चढू लागलो . अर्ध्या तासात आम्ही  डोंगरमाथ्यावर जाऊन पोचलो . तिथल्या छोटयाशा देवळाच्याबाहेर सर्वजण थांबलो . सरांनी दुर्बिण लावली आणि एकेकला नक्षत्रे दाखवून त्यांच्याविषयी ते माहिती देऊ लागले . सारी आकाशगंगा डोळ्यासमोर तरळत राहिली .
आकाशातील ताराकापुंजानी आमचे लक्ष वधून घेतले . जणू काही प्राजक्ता फुलून त्याची पांढरीशुभ्र फुले  चांदण्याच्या रुपाने 

0 comments: