निसर्गाच्या सहवासात
निसर्गाच्या सहवासात
माणसाचे निसर्गाशी असलेले नाते जुने आणि अतूट आहे . लहानग्या रडणाऱ्या मुलाला आई काऊ- चिऊ दाखवून गप्प करते . प्रत्येक्ष भगवान रामचंद्राना ते बाळरूपात असताना ,चंद्रच हवासा वाटला होता .बाळपणातून कुमारवयात जातानाही आपला बराच काळ निसर्गाच्या सहवासातच जातो . जसे ,नदीत डूबने ,झाडावर माकडासारखे चढून कैऱ्याचिंचा खाणे ,वडाच्या पारंब्यांना पकडून सूरपारंब्यांचा खेळ खेळणे इत्यादी . सुट्टीत खेडेगावात आजोळी वा काकांकडे जाणारी मुले वाडयाच्या सावलीत बसण्याऐवजी टोळकी करून मळयातून ,शेतातून ,रानातून का भटकतात.?असा प्रश्न मोठ्यांना पडतो . हे आहे निसर्गाचे आकषर्ण . दर सुट्टीतपदभ्रमणाला ,गिर्यारोहणाला आणि व्यवस्थित योजना आखून देशोदेशीची माणसे हिमालयावर चढाईसाठी का
जातात ? ही आहे रक्तातली निर्सगाची ओढ !

निसर्गाच्या सहवासात माणसाच्या वृत्ती फुलून येतात . प्रपंचातील
चिंता ,व्यथा यांची अभ्रे निवळून जातात. लेखक ,कवी यांना तर निसर्गाची किती ओढ असते! कवी बा. भ. बोरकर म्हणतात ,'हिरवळ आणिक पाणी! तेथे स्फूर्ती मजला गाणी !' कुसुमाग्रजांनी चंद्राचे वर्णन, 'स्वप्नांचा सौदागर' असे केले आहे. निसर्गाच्या सहवासातच आपल्या पूर्व्सुरीना वेद स्फुरले. संत तुकाराम महाराजांना तर वृक्षवल्ली,वनचरे आपले 'सोयरे' वाटतात ; त्यांच्याशी ते सवांद साधतात. हिमालय किती भव्य की त्याला पाहून कालिदासाला 'पृथ्वीच्या मापदंडा'ची कल्पना सुचली.
निसर्ग हा केवळ स्वप्नेच पुरवतो असे नाही,तर तो माणसाला सहस्र करांनी सतत काही न काही पुरवत असतो. पण या करंट्या माणसांची झोळी फाटकी ठरते. निसर्गातील प्रत्येक गोष्ट माणसाच्या हितासाठीच झटत असते. सुर्यापासून माणसाला प्रकाश मिळतो, उष्णता मिळते. सूर्यप्रकाशात झाडे वाढतात. चंद्र, त्याचे चांदणे, ग्रह,उपग्रह यांच्या सहवासात माणूस उतसाहित होतो. नदीच्या सहवासात विविध संस्कृती विकसित झाल्या आहेत. समुद्राने माणसाला जलप्रवासाचा आनंद दिला. मीठ देऊन त्याचे भोजन रुचकर केले. त्याला विविध रत्नांनी समृद्ध केले आणि आता 'काळे सोने' म्हणजे इंधन पुरवून माणसाच्या जीवनाची गती वाढवली.
निसर्ग मानवाचा सच्चा मित्र आहे. त्याने माणसाला भव्यता, उदात्ता,रौद्रता आणि शीतलता या गुणांची ओळख करून दिली. पशुपक्ष्यातील विविधता माणसाला अचंबित करून टाकते. आज घाईगर्दीत गुरफटलेल्या माणसाला या निसर्गाकडे पाहायलाही फुरसत मिळत नाही. कधी कधी माणसाला स्वतःच्या कर्तुत्वाचा अतोनात गर्व होतो. तेव्हा भूकंप, महापूर वा दुष्काळ असे दनकेही निसर्ग माणसाला देतो.
माणसाला आपल्या निर्मितीचा, कलाकृतीचा मोठा गर्व आहे. पण निसर्गरूपी कलावंताच्या कलाकृतीतील सौंदर्य माणसाच्या या अहंपणालाही छेदून जाते. एकूण काय ,' निसर्गाविना मानव असंभव.'

0 comments: