निसर्ग -एक जादूगार
जून -जुलैमध्ये शाळा -महाविदयालय सुरु झाली की
,नित्यनेमाने वर्षाऋतूचे आगमन होते . आषाढ महिन्यात तर सूर्याचे दर्शन
दुर्लभ होतो . पाऊस असो वा नसो ,दिवसभर मळभ असते . त्या कुंद वातावरणात मन
थोडेसे उदास झाले असताना समोर दिसणाऱ्या टेकडीकडे सहजच लक्ष गेले आणि
आश्चर्याचा धक्का बसला . मे महिन्यात ओकीबोकी दिसणारी ,मातीने लाल दिसणारी
ही टेकडी आता जणू हिरवा शालू नेसून नववधूसारखी सजून उभी होती . मे
महिन्याच्या सुट्टीत कितीतरी वेळा मी या टेकडीवर गेलो होतो . सुसाट
वाऱ्याबरोबर तेथे धावलो होतो . या रखरखीत भूमीतून हिरवे अंकुर कधी फुटतील असे वाटलेच नव्हते . कवी मंगेश पाडगावकर यांच्या 'सत्कार 'कवितेचे चरण ओठावर आले -'पहिल्या हिरव्या तृणपात्याचा आज असे सत्कार '. ही सारी किमया कोणी केली ?तो किमयागार आहे -निसर्ग !
12 comments: