चांदण्यातील सहल
कॉलेजजीवनात 'सहल 'हा सगळ्याच्या आवडीचा आणि उत्साहाचा विषय असतो आतापर्यंत आमच्या
मित्रमंडळीच्या अनेक सहली काढून झाल्या होत्या . वर्षासहल काढून पावसात चिंब भिजण्याची हौसही आम्ही भागवून घेतली होती . या वेळेस काही नवे अनुभवावे असे वाटत होते . अलीकडच्या काळात टयूबलाईटच्या चकचकाटमुळे चांदणे अनुभवताच येत नाही . त्यामुळे मग सगळ्यांच्या मते चांदण्यातील सहल काढण्याचे ठरले . आमच्या भूगोलाच्या अध्यापकांनीही आमच्या कल्पनेला दुजोरा दिला . गावाबाहेरच्या , जवळच्याच एका टेकडीवर जाण्याचे ठरले . जमल्यास तारांगणाचाही थोडा अभ्यास करायचा होता . बरोबर दुर्बिणीही घेतल्या होत्या .